Showing posts with label Maharashtra.. Show all posts
Showing posts with label Maharashtra.. Show all posts

Wednesday, April 24, 2013

विवेकानंद आणि डॉ. आंबेडकर पुस्तकाचे प्रकाशन

स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीतर्फे ‘स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (१४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ऍम्फी थिएटरमध्ये बौद्ध धर्मगुरू भन्ते सुमेधजी यांच्या हस्ते होणार आहे.
स्वामी विवेकानंद यांचे १५० वे जयंती वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे प्रकाशन होत आहे. रमेश पतंगे यांनी लिहिलेले हे पुस्तक विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे.
संभाजीनगर (औरंगाबाद) येथील डॉ. आंबेडकर यांचे अभ्यासक रमेश पांडव यांचे व्याख्यान यावेळी होईल. याशिवाय प्रा. विक्रम कांबळे व प्रा. विलास बेत हे पुस्तकासंबंधी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. विवेकानंद केंद्राचे प्रांत संघटक विश्‍वास लपालकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.या पुस्तकामुळे बहुतेक करून दुर्लक्षित राहिलेले स्वामी विवेकानंदांचे सामाजिक विचार आणि त्याच पद्धतीने दुर्लक्षित राहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धार्मिक विचार यांचे दर्शन होते, अशी माहिती संयोजक वल्लभदास गोयदानी यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधाने पुष्कळ लेखन केलेले लेखक रमेश पतंगे यांनी स्वामी विवेकानंदांच्या सामाजिक विचारांचा आढावा घेणारे पुस्तक लिहिले आहे. तो आढावा घेताना त्यांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये किती साम्य होते, हे दाखवून दिल्याचेही ते म्हणाले.


Wednesday, February 20, 2013

Solapur Suryanamaskar Mega Event



फेब्रुवारी, 2013 सोलापूर | प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीने सोमवारी आयोजित केलेल्या सामूहिक सूर्यनमस्कार महायज्ञात ५ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी ४० हजार ८१७ सूर्यनमस्कारांची आहुती दिली. पार्क मैदान येथे सकाळी १० वाजता झालेल्या या कार्यक्रमात शहरातील ७५ शाळांतील विद्यार्थ्यांनी संस्कृत मंत्रांसह सूर्यनमस्काराची सात आवर्तने केली.

व्यासपीठावर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. एम. मालदार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. स्वर्णलता भिशीकर, मनपा सभागृह नेते महेश कोठे, रोहिणी तडवळकर, पेंटप्पा गड्डम, शहाजी पवार, दीपक पाटील, वल्लभदास गोयदानी, दामोदर दरगड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. शिवराज पाटील, सूत्रसंचालन प्रसाद जिरांकलगीकर तर आभार प्रदर्शन राजेश कळमणकर यांनी केले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. 

५८३१ विद्यार्थी

७५ शाळा

३०० शिक्षक

११२ कार्यकर्ते

०७ सूर्यनमस्कार आवर्तने

४०८१७ एकूण सूर्यनमस्कार

३७ दिवसांपासून तयारी

विवेकानंदांची प्रेरणा हनुमान
भारत बलशाली बनण्यासाठी आधी तुम्ही सशक्त बना, असे आवाहन डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी विद्यार्थ्यांना केले. महाबली हनुमान हे स्वामी विवेकानंदांचे प्रेरणास्थान होते. दुर्बलांना जगात कोणीच विचारत नाही, म्हणून मन वज्र हवे अन् मनगट ते पोलाद असा संदेश स्वामीजींनी दिला.

देशव्यापी उपक्रम
स्वामी विवेकानंदांनी बलशाली बनण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे रथसप्तमीचे औचित्य साधून देशभरात सुमारे दोन कोटी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचाच भाग म्हणून सोलापुरात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन केले.
- संदेश पवार, कार्यकर्ता

पोवाड्याने संचारला उत्साह
सूर्यनमस्काराच्या प्रारंभी अपर्णा सहस्रबुद्धे आणि सहकार्‍यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. पहाडी आवाजातील पोवाड्याने उपस्थितांत वीरश्री संचारली.

उपस्थित अन्य मान्यवर
बसवराज देशमुख, सुहास देशपांडे, राजेश काटवे, प्रा. नरेंद्र काटीकर, रंगनाथ बंग, रंगनाथ बंकापूर, डॉ. शोभा शाह, माया गांधी, स्नेहल पेंडसे, नंदकुमार चितापुरे, प्रा. प्रशांत स्वामी, संध्या औरसंग, हिराचंद बोडा, नागेश स्वामी, अभय कामतकर, प्रा. व्यंकटेश तुम्मनपल्ली, प्रा. अनिता अलकुंटे
Tags:

    Maharashtra
    Suryanamaskar Yagna