Wednesday, February 20, 2013

Solapur Suryanamaskar Mega Event



फेब्रुवारी, 2013 सोलापूर | प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीने सोमवारी आयोजित केलेल्या सामूहिक सूर्यनमस्कार महायज्ञात ५ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी ४० हजार ८१७ सूर्यनमस्कारांची आहुती दिली. पार्क मैदान येथे सकाळी १० वाजता झालेल्या या कार्यक्रमात शहरातील ७५ शाळांतील विद्यार्थ्यांनी संस्कृत मंत्रांसह सूर्यनमस्काराची सात आवर्तने केली.

व्यासपीठावर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. एम. मालदार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. स्वर्णलता भिशीकर, मनपा सभागृह नेते महेश कोठे, रोहिणी तडवळकर, पेंटप्पा गड्डम, शहाजी पवार, दीपक पाटील, वल्लभदास गोयदानी, दामोदर दरगड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. शिवराज पाटील, सूत्रसंचालन प्रसाद जिरांकलगीकर तर आभार प्रदर्शन राजेश कळमणकर यांनी केले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. 

५८३१ विद्यार्थी

७५ शाळा

३०० शिक्षक

११२ कार्यकर्ते

०७ सूर्यनमस्कार आवर्तने

४०८१७ एकूण सूर्यनमस्कार

३७ दिवसांपासून तयारी

विवेकानंदांची प्रेरणा हनुमान
भारत बलशाली बनण्यासाठी आधी तुम्ही सशक्त बना, असे आवाहन डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी विद्यार्थ्यांना केले. महाबली हनुमान हे स्वामी विवेकानंदांचे प्रेरणास्थान होते. दुर्बलांना जगात कोणीच विचारत नाही, म्हणून मन वज्र हवे अन् मनगट ते पोलाद असा संदेश स्वामीजींनी दिला.

देशव्यापी उपक्रम
स्वामी विवेकानंदांनी बलशाली बनण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे रथसप्तमीचे औचित्य साधून देशभरात सुमारे दोन कोटी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचाच भाग म्हणून सोलापुरात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन केले.
- संदेश पवार, कार्यकर्ता

पोवाड्याने संचारला उत्साह
सूर्यनमस्काराच्या प्रारंभी अपर्णा सहस्रबुद्धे आणि सहकार्‍यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. पहाडी आवाजातील पोवाड्याने उपस्थितांत वीरश्री संचारली.

उपस्थित अन्य मान्यवर
बसवराज देशमुख, सुहास देशपांडे, राजेश काटवे, प्रा. नरेंद्र काटीकर, रंगनाथ बंग, रंगनाथ बंकापूर, डॉ. शोभा शाह, माया गांधी, स्नेहल पेंडसे, नंदकुमार चितापुरे, प्रा. प्रशांत स्वामी, संध्या औरसंग, हिराचंद बोडा, नागेश स्वामी, अभय कामतकर, प्रा. व्यंकटेश तुम्मनपल्ली, प्रा. अनिता अलकुंटे
Tags:

    Maharashtra
    Suryanamaskar Yagna

No comments:

Post a Comment

Thanking you for your Message.