Sunday, February 17, 2013

स्वामीजी के वीर चले - Shobha Yatra at Solapur

Note : Due to Shobha Yatra of  "Gram Daivata"  from 11th Jan to 13th Jan, Swami Vivekananda Shard Shati Samaroh Shobha Yatra held on 6th Jan. 2013 in Solapur.
------------------------
दृष्टिक्षेपात शोभायात्रा

४५ शाळा, १0 हजार विद्यार्थी अन् १५ चित्ररथांचा शोभायात्रेत सहभाग

स्वामी विवेकानंद यांच्या १५0 व्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यांच्या जयंती दिवशी देशभर १२ जानेवारीला शोभायात्रा काढण्यात येत आहे, मात्र यादिवशी सोलापुरात गड्डा यात्रा असल्यामुळे सोलापुरात ६ जानेवारी रोजी ही शोभायात्रा काढण्यात आली. स्वामी विवेकानंदांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश आहे. - प्रा. नरेंद्र काटीकर

या प्रमुख मार्गांवरून निघाली शोभायात्रा,
सायंकाळी साडेचार वाजता बाळीवेस चौकात धर्मराज काडादी, सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या हस्ते या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. बाळीवेस, मंगळवारपेठ पोलीस चौकी, मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, नवीपेठ, मॅकॅनिकी चौक, लकी चौक या मार्गांवरून मोठय़ा दिमाखात निघालेल्या या शोभायात्रेचा सायंकाळी साडेसात वाजता समारोप झाला. या शोभायात्रेत आ. विजयकुमार देशमुख, नगरसेवक जगदीश पाटील, मोहिनी पत्की, चंद्रिका चौहान, शोभा नष्टे, शुभांगी बुवा, राजू पाटील, तेजा कुलकर्णी, प्रा. नसीमा पठाण, शाहू शिंदे, दीपक पाटील, प्रकाश मीठभाकरे, दामोदर दरगड, प्रकाश काटवे, रंगनाथ बंकापूर, जगदीश तुळजापूरकर, प्रशांत बडवे, महेश अंदेली, अनिल पाटील आदी सहभागी झाले होते. वल्लभदास गोयदानी यांनी या शोभायात्रेचे संयोजन केले. ■ शोभायात्रेची सुरुवात बाळीवेसमध्ये तर समारोप चार पुतळा येथे
  •  शोभायात्रेच्या समारोपावेळी आतषबाजी
  •  अनेक जण स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषेत
  •  नंदीध्वजांच्या प्रतिकृतीसह बालवारकरी मंडळ सहभागी
  •  चित्ररथ अन् पथकांमुळे शोभायात्रा लक्षवेधक दृष्टिक्षेपात शोभायात्रा दृष्टिक्षेपात शोभायात्रा
स्वामी विवेकानंद यांच्या १५0 व्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यांच्या जयंती दिवशी देशभर १२ जानेवारीला शोभायात्रा काढण्यात येत आहे, मात्र यादिवशी सोलापुरात गड्डा यात्रा असल्यामुळे सोलापुरात ६ जानेवारी रोजी ही शोभायात्रा काढण्यात आली. स्वामी विवेकानंदांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश आहे.
- प्रा. नरेंद्र काटीकर

शोभायात्रा प्रमुख  स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेतील घोड्यावरील विद्यार्थी लक्ष वेधून घेत होता.
स्वामी विवेकानंदांच्या साहित्याची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रेत एनसीसी विभागातील मुलांनी संचलन करीत सहभाग नोंदविला.  स्वामी विवेकानंद यांच्या १५0 व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महिलांनी फेटा बांधून हिरिरीने सहभाग घेतला. 

मिलिंद राऊळ सोलापूर। दि. ६ (प्रतिनिधी)
कौन चले भाई कौन चले.. स्वामीजी के वीर चले, भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणा आहेत शोभायात्रेतील. स्वामी विवेकानंदांच्या १५0 व्या जयंतीनिमित्त ४५ शाळा, १५ चित्ररथ आणि १0 हजार विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या शोभायात्रेने रविवारी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

सार्ध शती समारोह समितीच्या वतीने स्वामी विवेकानंदांच्या १५0 व्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी सायंकाळी ही मिरवणूक काढण्यात आली. ढोल, ताशा, स्कॉर्ब डान्स, टिपर्‍या, भजन, विविध वेशभूषा यामुळे शोभायात्रा लक्षणीय ठरली. शोभायात्रेच्या सुरुवातीला तीन घोडेस्वार होते. यावर जिजाऊ, शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषेतील तरुण बसले होते. हलगीनादात बाराबंदीच्या वेशात बालचमू सिद्धेश्‍वर महाराजांच्या काठय़ांसह सहभागी झाले होते. टाळ-मृदंगात दंग होऊन नाचणार्‍या वारकर्‍यांची बालदिंडी, १५0 बाल स्वामी विवेकानंद, फेट बांधून सहभागी झालेल्या महिला, लहान मुलांपासून ते महाविद्यालयीन युवक-युवती आणि नागरिकांपर्यंत सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला. चित्ररथाद्वारे स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील विविध प्रसंग दाखविण्यात आले. यामुळे ही शोभायात्रा चर्चेचा विषय ठरली.

या शोभायात्रेत स्वामी विवेकानंद टेक्नॉलॉजी, सिद्धेश्‍वर इंग्लिश मीडिअम, होम सायन्स, सिद्धेश्‍वर प्रशाला, पॉलिटेक्निकल, बी. एस. कुलकर्णी प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, शेठ रावजी सखाराम आयुर्वेद कॉलेज, श्राविका विद्यालय, सुरवसे हायस्कूल, वसंतराव देशमुख विद्यालय, मॉडर्न हायस्कूल, शासकीय औद्योगिक प्रशाला, एस. ई. एस पॉलिटेक्निकल, वालचंद महाविद्यालय, बीएमआयटी, जैन गुरुकुल, कस्तुरबा अध्यापक विद्यालय, ए. जी. पाटील महाविद्यालय, दयानंद आसावा प्रशाला, दमाणी, शिवाजी प्रशाला आदी शाळा-महाविद्यालये सहभागी झाली होती.

ref : http://vivekananda150jayanti.org/medita/2013/January/6/shobha-yatra-solapur

No comments:

Post a Comment

Thanking you for your Message.