Sunday, February 17, 2013

Shoba Yatra at Kalyan, Mumbai

स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या दिना निमित्त कल्याण शहरातून बिर्ला महाविद्यालय, बेतूरकर पाडा, सरस्वती विद्या मंदिर, सिंडीकेट, पारनाका व शिशूविकास शाळा येथून ५ शोभायात्रा निघाल्या. या शोभायात्रांत ५०००च्या वर स्त्रि-पुरुष नागरिक, शाळा, महाविद्यालयिन विद्यार्थि/विद्यार्थिनी, शिक्षक/शिक्षिकांनी सहभाग दिला. शाळांची लेझिम पथके, शिवदुर्गा प्रतिष्ठानचे ढोल पथक, विद्यार्थ्यांनी हातात धरलेली स्वामीजींची वचने. घोषणा यांनी वातावरण दुमदुमुन गेले होते. काळातलाव येथे यात्रा पोहोचल्यावर सार्धशती समारोह समितीचे जिल्हा संयोजक श्री. प्रवीण देशमुख यांनी सार्ध शती समिती व वर्षभर होणारे कार्यक्रम यांची माहिती सांगितली. काळातलाव महोत्सवा अंतर्गत जिवन विद्या मिशनचे आदरणीय प्रल्हाददादा पै यांचे प्रवचन झाल्यावर कार्यक्रम संपला याप्रसंगी हजारो नागरिक व प्रतिष्ठीत महानुभाव उपस्थित होते. शोभायात्रेत सहभागी शाळांना स्वामी विवेकानंदांची सुंदर फ्रेम भेट देण्यात येत आहे.

या शोभायात्रांशिवाय लक्ष्मण देवराम सोनावणे कॉलेजमध्ये विवेकानंद केंद्र कार्यकर्ते मा. श्री. अमोल कुलकर्णी यांचे विद्यार्थी व प्राध्यापकांपुढे भाषण झाले. बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थी, बिर्ला एन.सी.सी.चे कॅडेट, व आधारवाडी कारागृहात २५० कैद्यांसमोर स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंती निमित्त स्वतंत्र कार्यक्रमांत बिर्ला महाविद्यालयाचे प्रा. बिपिन वाडेकर यांनी मार्गदर्शन केले. रोटरी क्लबने पारनाका येथिल अभिनव विद्या मंदिर येथे रक्तदान शिबिर घेतले. पारनाका मित्रमंडळाने स्वामीजींच्या पुतळ्याचे पूजन, संध्याकाळी स्वामीजींच्या गीतावर आधारीत कथ्थक नृत्य, रात्री किर्तन असा भरगच्च कार्यक्रम केला. ही त्यांचे कार्यक्रम केले. १२ जानेवारीचा दिवस असा विवेकानंदमय झाला होता.
स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती, कल्याण (प)स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंती निमित्त कल्याण शहरातून ५ भव्या शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रा शनिवार दि. १२ जानेवारी २०१३ रोजी दुपारी ३.३० वाजता खालील ठिकाणांहून निघतील.
१) पारनाका विवेकानंद पुतळा,
प्रमुख उपस्थिती मा. महापौर वैजयंतीताई घोलप/गुजर, जागतिक किर्तीचे शिल्पकार व प्रांत समितीचे सदस्य मा. भाऊराव साठे, जनता बॅंकेचे अध्यक्ष श्री. मोहन आघारकर, श्री. प्रफुल्ल गवळी, श्री. गोपाळभाई राठोड, श्री. दिलिपभाई पटेल श्री.विनायक मालसे, सौ. सुनिता केळकर, सौ.शिला रिसबूड, सौ. सुनंदा मोने, सौ. मेधा आघारकर, सौ. सुप्रिया पटवर्धन श्री. राजेश महाले, श्री. चंद्रकांत गोहेल, श्री. चंद्रकांत गोहेल, श्री. सुनिल पटेल, श्री. हर्षदभाई पटेल

२) साई हॉल, वायले नगर
, प्रमुख उपस्थिती मा. आमदार प्रकाश भोईर, प्रा. ल.द.जोशी, श्री श्रिधर केळकर, श्री. विलास शेटेसर, श्री. पद्मनाभ जोशी.

३) शिशूविकास शाळा, आंबेडकर रोड
, प्रमुख उपस्थिती, मा. श्री. अरविंदभाई ठक्कर, श्री. विनोदभाई पटेल, श्री. विजय नारायण पंडीत, श्री. महेश जोशी, श्री. प्रकाश पेणकर, श्री. इरफान शेख

४) सरस्वती विद्या मंदिर सिंडीकेट
, प्रा. अशोक प्रधान, श्री. विजय साळवी, श्री. मिलिंद कुलकर्णी, अ‍ॅड. विद्या गोळे, प्रा. विलास पेणकर, डॉ.संदिप जाधव, डॉ.सुरेश एकलहरे.

५) बिर्ला महाविद्यालय,
मा. अर्जून म्हात्रे, डॉ. एस.पी. काकरमठ, डॉ. अनंत ईटकर, श्री. भिकू बारस्कर, सौ. निरजा मिश्रा
या सर्व यात्रा संध्याकाळी ५.३० वाजता काळातलाव येथे पोहोचतील. तेथे मा. प्रल्हाददादा वामनराव पै यांच्या मार्गदर्शनाने विवेकानंद सार्ध शती समारोहाचे उदघाटन करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Thanking you for your Message.